Posts

Showing posts from September, 2014

अनाहूत ....

अनाहूत .... जाता तू पाऊलांचे ठसे ऊमटून गेली ह्रदयात माझ्या शिल्प तू कोरून गेली नयनात तूझीया ढग दाटून आले पापण्यांची फूले ईथे बरसून गेली लाजणे फूलापरी फूलपाखरू बनावे मनाची फूले ह्रदयी ऊमलून गेली शब्दात काय सांगू अपूरेच सारे ही रात्र सारी ह्रदय चोरून गेली पाहिले मागे वळून हासुन जेंव्हा गूज अंतरीचे परी सांगून गेली लावण्य तूझे मज भूलवून गेले क्षणात मती काही कुंठून गेली श्री. प्रकाश साळवी दि. 16/09/2014

ओघळले अश्रू...!

ओघळले अश्रू...! ओघळलेले अश्रू निखारेच होते पापण्यांचे ते किनारेच होते ।।1।। का जाहल्या वाटा ऊदास ह्या वाटचे वाटसरू हे शिकारेच होते ।।2।। देऊच केले नजराणे फूलांनी तूझे हासणे ते बहाणेच होते ।।3।। भरले आकाश पाखरांनी थव्यांच्या मदमस्त तूझे ते नजारेच होते ।।4।। मखमली चालणे गजगामिनीचे नजरेत तूझ्या त्या दरारेच होते ।।5।। चांदण्यात होती खीन्नता जराशी स्पर्षात माजलेले थरारेच होते ।।6।। श्री. प्रकाश साळवी. दि. 10-09-2014.

जगणे जगायचे !!!

जगणे जगायचे !!! आयुष्य आहे, खुशीत जगायचे रडत आलो, हसत जायचे दिवस येतीलही, जातिलही रात्री सुखात झोपायचे दू:ख येइलही, सुख ही येईल परी नाही डगमगायचे काटें असतील चालताना चूकवित काटें चालायचे कधी हार कधी जीत स्वागत त्याचे करायचे! स्वप्ने ऊद्याची पहायची स्वप्नात रंगून जायचे कधी ऊन कधी पाऊस पावसात चिंब भिजायाचे जीवन मात्र जगायचे कधी हसत कधी रडत जगणे जगत रहायचे श्री. प्रकाश साळवी दि.09-09-2014 आयुष्य आहे, खुशीत जगायचे रडत आलो, हसत जायचे दिवस येतीलही, जातिलही रात्री सुखात झोपायचे दू:ख येइलही, सुख ही येईल परी नाही डगमगायचे काटें असतील चालताना चूकवित काटें चालायचे कधी हार कधी जीत स्वागत त्याचे करायचे! स्वप्ने ऊद्याची पहायची स्वप्नात रंगून जायचे कधी ऊन कधी पाऊस पावसात चिंब भिजायाचे जीवन मात्र जगायचे कधी हसत कधी रडत जगणे जगत रहायचे श्री. प्रकाश साळवी दि.09-09-2014

अजून मेला नाही रावण !!!

अजून मेला नाही रावण जरी घडले असले श्री रामायण अजून मेला नाही रावण क्षणोक्षणी चाले भ्रष्टाचार पैशासाठी होई मानव लाचार सत्याचे तर झाले खंडण अजून मेला नाही रावण ।1। सूडाने कुणी पेटून ऊठतो माय पित्याला हाकून देतो मना मनात द्वेषालाच मान अजून मेला नाही रावण ।2। ना नात्याचे कुणास बंधन बापच करतो मुलीचे शोषण कलंक आहे असले जीवन अजून मेला नाही रावण ।3। नाही राहीले जन लज्जेचे भान माय भगिनींचा क्षणोक्षणी अपमान सुवासिनीला घरात डांबून वेश्येला मान अजून मेला नाही रावण ।4। कुणी साधुचे सोंग घेऊनी स्री भक्तांचे भोग भोगूनी म्हणे मीच संत महान अजून मेला नाही रावण ।5। अमरत्वाचे वरदान रावणा रामाने जरी घऊन प्राणा जीवीत आहे रावण भावना अजून मेला नाही रावण ।6। श्री. प्रकाश साळवी. दि. 06 सप्टें. 2014.