Posts

Showing posts from May, 2014

येथील वेडा सांड तो

Image

प्रीत अंतरीची

Image

बरस रे घना...!

Image
 

मला काय त्याचे !

Image

मूक प्रीती

Image

जगावे कसे-जगावे असे

Image

अशी तू तशी तू

Image

प्रीत माझी भाबडी

प्रीत माझी भाबडी शृंगार केला तूजसाठी रे सख्या पाहून जा प्रीतीत गाईले जरी गाणे गडे ऐकून जा सुगंध शिंपिला फुलांचा लाजली जाई-जुई शब्दात नाचुनी प्रीत दिवाणी तू घोकून जा चैत्रात चांदणे जणू सैलावले नभांगणी आभाळ फाटल्यापरी सर्व संग भोगून जा ठेऊन लज्जा वेशीवरी मी निसंग जाहले तुझ्या प्रीतीचे ते किनारे मैफिली शोधून जा पाण्यापरी निष्कलंक ही प्रीत माझी भाबडी धुंदीत येउनि फुलांचा ताटवा फेटून जा श्री. प्रकाश साळवी दि. १७ मे २०१४. http:/www.prakashsalvi1.blogspot.in

येथे शहाणे कोण आहे?

येथे शहाणे कोण आहे? आता मला समजले येथे शहाणे कोण आहे! ते शहाणे किती, आणि दीड शहाणे कोण आहे! हे मायावी जगाचे मायाजाल आहे येथे ठाऊक हे कोणा येथे दीवाणे कोण आहे ! काव्यात रंगलेले सारे रसिकजन "रसिक" येथे ते सारे "अरसिक" किती आणि रसिक कोण आहे! मानले पुन्हा जरी हे सारे शहाणेच आहे मोजले तरी स्वतःला मी शहाणा कोण आहे! उगाच हा कशाला हवा वाद येथे शहाण्यांचा ठरवावे जयाने खुळा की  शहाणा कोण आहे! श्री. प्रकाश साळवी दि. १५ मे २०१४.

वंचनेच्या दुखाःत मी (गझल)

वंचनेच्या दुखाःत मी (गझल) वंचनेच्या दुखाःत मी (गझल) चार भिंतीतल्या तुरुंगात कोंडिले मी स्वतःला वंचनेच्या दुखाःत मी जाळिले स्वतःला राहणारी बरोबर माझ्या वंचना पण स्वतःची गाणारे मज साथ पण मी टाळीले स्वतःला गगनात विहरणारे क्रौंच - आकाशपक्षी मोकळ्या विवंचनेत मी पाळिले स्वतःला भरलेले विश्व सारे,  सारे माझेच मी   गराड्यात माणसांच्या मी गाळिले स्वतःला नाचले थवेच्या थवे येथे पक्षीगणांचे विवंचनेच्या मोगऱ्यात मी माळिले स्वतःला वेडाच मात्र मीच होतो सारे इथे शहाणे वेदनेच्या निखाऱ्यात मी पोळीले स्वतःला श्री. प्रकाश साळवी दि. १३ मे २०१४.    

तुज सवे येते मी

तुज सवे येते मी सर्व बंध तोडूनी मी येते रे तुझ्या श्वासासवे श्वास घेते रे श्रम तुझे परिहार करते रे मी येते रे कुशीत माझ्या रामाशी तू सागर गिरक्या घेशी तू ना फिक्र तुला कशाची माझ्या मगर मिठीत रमशी तू पहुडता तू पलंगावरी हलकेच तुज झेलते मी ना कशाची पर्व तुला खुशीत हलके हसते मी निद्रा देवी नाव माझे श्रम विहार करते सर्वांचे  श्री प्रकाश साळवी दि ११ मे २०१४.

पुनवेचे चांदणे

पुनवेचे चांदणे चांदणे अंधारी फितूर झाले रात्रीचे प्रकाशाशी सुत जमले उजळून निघाल्या चांदण्या प्रकाशाने विजेच्या अन काजव्यांचे थवेच्या थवे नाचले * पसरले आकाशाचे वादळ पंख मिटले ते अंधकारी मारून डंख मोडून निघाला पुनवेचा तो चंद्र तो आकाश सागरीचा प्रकाश शंख * पसरला पुनवेचा तो प्रकाश सागर ढवळून निघाला तीमिरांचा खंदर चांदण्यांनी लुटले सारे लख लख निशब्द चांदणे अन निर्सर्ग सुंदर श्री. प्रकाश साळवी दि. २६ एप्रिल २०१४.

फसवे सुख...

फसवे सुख... पाहून चित्र सारे मन मनालाच फसवीत होते  दुखा:तच सुख मानून मलाच हरवीत होते अंधार रात्र काळी माझे दिवे मिणमिणते नाच त्यांचे बेभान पणाचे झगमगाट त्यांचे सूर्य होते बुडाले जलाशय पण पाण्याला ना बंध येथे प्यायला पाणी नसे ना माणसे-पक्षी मरत होते अगणित बेहिशोबी "स्विस बँकेचे" भीकारी दोनशे रुपड्यांसाठी कामकरी मात्र बारा तास मरत होते सुखाचे मार्ग आणखी हवे कशाला? मी मात्र दुखा:ला साथ करून सुख समजावीत होते  श्री. प्रकाश साळवी दि. २६ एप्रिल २०१४.

सार्थक जीवनाचे..

सार्थक जीवनाचे.. सखे ग आज मी धन्य धन्य झाले, जीवनाच्या सरोवरी एक "कमळ" उगवले, जिकडे तिकडे हर्ष दाटला अंतरंगी जणू "मित्र" उदेला वायुने परी गंध पसरिला कसे करू मी स्वागत याचे, ध्यास मनी हा लागला ----------- १ . ** काऊ यारे चिवू यारे मम बाळाचे स्वागता रे, "आई" होण्याचे मज लाभले रे भाग्य माझे कसे उदेले हर्षित झाले मन माझे रे ------------ २ . ** या ग या सयांनो सत्वर गुपित माझे पुसा भराभर चैन पडेना मजल क्षणभर माझिया मनीच्या बनात नाचू लागे थुई थुई मोर ------------ ३ . ** रंध्रात माझिया भिनले रे राजसा तुझिया मोहाचे क्षण आज असावा तू जवळी तर सार्थकी लागले माझे जीवन या आनंदाचा तू पण भागीदार ----------- ४ . श्री प्रकाश साळवी दि. २३ एप्रिल २०१४.

डोळ्यांनीच अश्रूला..

डोळ्यांनीच अश्रूला.. डोळ्यांनीच अश्रूला ढाळू नकोस म्हटले गालातील ओठांना मात्र ईथे हसू फुटले भ्रष्टाचाऱ्यांनी ईथे तर चंग बांधला शिष्टाचाऱ्यांचे तर ईथे पांग फिटले वसनांची तर ईथे वाघीण फुटली नग्नतेचे मात्र ईथे वादळ सुटले भलाईला ना ईथे कुठे आसरा पाप्यांचे तर ईथे पितर उठले खोट्यांच्या या बघा हरकती सत्यतेचे तर ईथे "शील" लुटले  अश्रूंना ना ईथे वाट मोकळी टिंगल टवाळ्यांचे मात्र ईथे पेव सुटले श्री प्रकाश साळवी दि. २२ एप्रिल २०१४ .

कवितेचा दास.!

कवितेचा दास.! चालताना रस्त्याने कविता प्रसवतो मी, झोपेतून जागताना कविता सुचवतो मी, मोठे शब्दांचे पंख लाउनी उडाले आकाश ते, पंखाच्या एका पिसाने घेतली भरारी मी, संस्कृतीचे बांधले मोठे इमले त्यांनी शब्दांच्या साध्या विटांनी बांधली झोपडी मी, दाम्भिकतेचे गरळ ओकले ते काही बाही, साध्याच रंगांनी रंगविली कविता मी, दर्शवते जणू कवितेचे एकले जाणते ते, विनम्र होऊन तुम्हा सांगतो कवितेचा दास मी. श्री. प्रकाश साळवी दि. १९ एप्रिल २०१४.

तू येशील का?

तू येशील का? माझिया मनीचे गुज तू पुसशील का? तोडूनी सर्व बंध तू येशील का? टिपूर चांदणे पुनवेचे अन तू असावीस जवळी, या चांदण्याचे अमृत सेवण्या तू येशील का? हि किर्र रात तुजवीण वाटे उदासवाणी, रात राणीचे सुंगंध घेउनि तू येशील का? का जीवन वाटे उदासवाणे, सर्व काही तुचही, मोकळ्या  केसात गजरा माळून तू येशील का? काय जगाची तमा तुला, तू स्वैर मोकळी, अबोल आपुले प्रेम सार्थ करण्या तू येशील का? हे नियतीनेच बांधले धागे आपुल्या प्रीतीचे, धुंद - बेधुंद होऊनी अशी तू येशील का? ये अशी तू मुक्तपणे सर्व पाश तोडूनी, शपथ आपुल्या प्रीतीची तू येशील का? श्री. प्रकाश साळवी दि. १३ एप्रिल २०१४.

हे राम.!!

हे राम.!! सत्याचा मंत्र बापू ने दिला त्याचे "तीन तेरा वाजले", ज्यांचे हात रक्ताने माखले त्यांचेच ढोल वाजले, लोकशाही म्हणून "ठोकशाहिचा" बोभाटा केला, बापूच्या हत्येचे राजकारण करून स्वतःच नाचले जनतेचे, जनतेसाठी, म्हणून "लोकशाही" आणली, लोकशाहीच्या नावाने यानी मात्र "बंगले" बांधले, गरिबांचे शोषण करून यांचे "राक्षस" सरसावले, "गरीबी हटाव" च्या नावाने, यानी गरीबच हटवले गिरण्यांच्या जमिनी विकून यानी "बिल्डर" आणले, ज्यांचे मुडदे पडले असते, त्याना यानी "मंत्री" बनवले, शेतकर्‍याच्या भल्यासाठी यानी "साखर पेरणी" केली, आत्महत्येचे पातक साधून यांनी त्यांचे गळे कापले, एक बापू अजूनही करतोय गांधीगिरी "राळेगणसिद्धीत " त्यालाच यांनी खोटे ठरवून "जेल मध्ये" धाडले हे राम म्हणतच आपल्याला "लोकशाहीतच" राहावे लागेल, जनतेचे प्रतिनिधी म्हणून हेच आम्हाला धमकाऊ लागले, श्री. प्रकाश साळवी दि. ०७ एप्रिल २०१४

कधी लागेल गोडी तव नामाची!!

कधी लागेल गोडी तव नामाची!! जाणिले जरी अशाश्वत विश्व सारे, अशाश्वत ब्रम्हांड सारे, तरीही ओढ ना घेई तव नामाची, का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची. सारे सुखाचे सांगाती, दुखाःत ना साथ देती, मायेचा पसारा, मायेत चिंब भिजवती, तव नामात सुख मोठे आली त्याची प्रचीती, का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची. ज्ञानेश-तुक्याने सांगितली याचीच महती, गोरा-नाम्याने यानेच साधली प्रगती, संत समागमानेच होईल नाहीशी अधोगती, का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची. तव नामातच दंग होऊ दे - गुंग होऊ दे, तन-मन माझे तुझेच नामी लागू दे, नामातच रंगुनी जाऊ दे हीच विनंती का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची. श्री प्रकाश साळवी दि २४ मार्च २०१४

तुझ्या आसवांचे.........

तुझ्या आसवांचे ढिगारे वाहतो मी तुझ्या मोकळ्या केसास "शहारे" आणितो मी इथे वेदनांना बहर येती वंचनेचे तुझ्या आठवणीना छळतो उगा मी, हास्यात इथल्या सारेच मग्न झाले रिकामेच प्याले उगा रीचवितो मी "गझलेत" माझ्या मी किती सुन्न झालो, इशारे तुझे यौवनांचे समजावतो मला मी, इथे राज्य आहे, उमलत्या कळ्यांचे, व्यर्थ सागराचे रक्त इथे फेसाळतो मी, श्री प्रकाश साळवी दि. २३ मार्च २०१४

पुढारी

पुढारी त्यांना हार तुरे वाहिले,त्यांचेच गीत गाईले अन उधळिली स्तुती सुमने, गोडवे त्यांचेच गाईले त्यांचेच सेवक जाहलो, रात्रन दिन वाहिलो, परी न त्यांचे राहिलो, दिन आमुचे साहिले, गर्जना त्यांच्याच होत्या, हाती झेंडे मिरविले, जे लढलेच नाही कधी, त्याचेच पवाडे गाईले , ढाल तलवार त्यांचे जाहलो, प्राणांची तमा न केली राबलो - गांजलो अन "मुर्दाबाद" मात्र आम्ही पहिले, ते " पुढारी" जाहले, लाल बत्ती त्यांना मिळाली, आम्ही उपाशी राहिलो, त्यांनी मागे वळून ना पाहिले, प्रकाश साळवी दि. २२ मार्च २०१४

माझेच चुकले सारे!

माझेच चुकले सारे! तू दिलेस भर-भरून, पण मी नाही घेतले हे, माझेच चुकले सारे, पण मी नाही साहिले हे, "घेऊन जा मला तू" जरी बोललीस तू हे, "आव्हान" तुझे ते मज नाही पेलवले हे, देऊन टाकले तू जरी सर्व काही, जणू दान सर्स्वाचे हे, देऊन टाकले हे, दिलास तू खजाना-दिल खुलासपणे तू, पण नाही सरसावलो, मन नाही धजावले हे, "प्रीतीचे" भांडार तू जरी दिले लुटावयाला, माझेच चुकले सारे! चोरी करावयाला, "सावज" हाताचे गेले निघोनी मी राहिलो निराहारी, माझेच चुकले सारे! शिकार करावयाचे हे, श्री प्रकाश साळवी दि. २१ मार्च २०१४ स. ११.४०

तू आलीस........................!

तू आलीस........................! तू आलीस वादळासारखी, प्रेमाचा पाला-पाचोळा घेऊन अन गेलीस निघून! तू आलीस वळवाच्या पावसासारखी, प्रेमाचा शिडकावा करून, अन गेलीस निघून! तू आलीस वाऱ्यासारखी, प्रेमाचा अलगद स्पर्श करून, अन गेलीस निघून! तू आलीस फुलासारखी, प्रेमाचा सुगंध घेऊन अन गेलीस निघून! तू आलीस विजेसारखी, प्रेमाचा कड-कडात, लख-लखाट करून, अन गेलीस निघून! तू आलीस पावसासारखी, प्रेमात चिंब भिजवून अन गेलीस निघून! तू आलीस अळवावरच्या पाण्यासारखी, प्रेमाचे थेंब टाकून, अन गेलीस निघून! तू आलीस डोळ्यातील अश्रूंसारखी, प्रेमाचे अश्रू टाकून, अन गेलीस निघून! तू आलीस अन गेलीस निघून, प्रेमाचे रोपटे लावण्यासाठी, अशीच येत जा, अधून मधून, श्री प्रकाश साळवी, दि. २६ मार्च २०१४

ऐसे झाले भोंदू...!

ऐसे झाले भोंदू...! शब्दास त्यांच्या त्यांनी जपलेच होते, मैफलीतले त्यांचे गाणे "विरक्तीचे" च होते, थोडी उभारी त्यांच्या शब्दास होती, सभेतलेच त्यांचे भाषण "भगवे" च होते, मी उगा का मारू फालतू बढाया, बोलतानाच त्यांचे अवसान गळालेच होते, अंगावरील शुभ्र वसने त्यांची "उसनिच" होती, डोळ्यातच त्यांच्या "अंगार" च फुलले होते, चालून चालले तरी थकले न त्यांचे किनारे, आशिर्वाद त्यांचे सारेच घेत होते, हाती ना त्यांच्या जरी तलवार होती, मनाच्या दारात ते मुडदे पाडीतच होते, जरी होत्या त्यांच्या गळ्यात रुद्र माळा शब्दातच त्यांच्या "विखार" च होते, श्री प्रकाश साळवी दि. २९ मार्च २०१४.

किती सांगून पाहिले

किती सांगून  पाहिले, समजाविले मी मनाला खरे पाहता जगण्याचा अर्थ निघून गेला या विराण वाळवंटी आल्या कुठून पालख्या भक्तीत नाचण्याचा छंद हा विरून गेला येथेच फुलले फुलांचे ताटवे कितीदा तरी हा मनाचा भ्रमर इथे सुगंध हुंगून गेला किती गायिली विराण गीते विराणलेल्या पणाची मंत्र मुग्ध शब्द त्यांचा अर्थ सांगून गेला आली जराशी हुशारी या मनाला जगण्याची नादात संगीताच्या तो गुरफटून गेला झोकून देती खुळेपणाने  या निर्झराचे फवारे पाहून जोश या जगण्याचा मंत्र घोकून गेला श्री. प्रकाश साळवी दि. ०८ मे २०१४.

रणरणत उन्ह !!!

Image
 

सल...

Image
सल... जग भासते विराणे जणू एकाला उभा मी सखी एकलेपणाचे कसे दुःख भोगतो मी ! हि भयाण रात्र सारी, जागून काढतो मी, स्मृती जागल्या प्रीतीच्या त्या, हलकेच झेलतो मी,            सखी एकलेपणाचे            कसे दुःख भोगतो मी !           त्या प्रीतीच्या घेतल्या शपथा कधी कढीला राग रुसवा किती आठवावे बहाणे तुझे ते शब्दांत गुंफतो मी,            सखी एकलेपणाचे            कसे दुःख भोगतो मी !           तव सहवासावीण काय अर्थ या जगण्याला, तव अबोल पणाचे गूढ शोधितो मी,            सखी एकलेपणाचे            कसे दुःख भोगतो मी !           भंगले स्वप्न माझे, रुसली पण धरा ही रुसली पण "प्रीत" माझी, मज सावरू कसा मी,            सखी एकलेपणाचे            कसे दुःख भोगतो मी !           राहून वाटते हे, काय चुकले असेल माझे? मम प्रीतीच्या फुलाचे, का बंध तोडले मी,            सखी एकलेपणाचे            कसे दुःख भोगतो मी !           श्री. प्रकाश साळवी दि. ०३ एप्रिल २०१४.

प्राजक्त सडा

Image

विसरल्या पहाट रात्री

विसरल्या पहाट रात्री विसरल्या पहाट रात्री, सुगंध मात्र राहिले भोगिले जे क्षण सुखाचे आठवणींत मात्र राहिले अर्धचंद्र पण प्रणयाळला तुझे अर्धोन्मिलित नेत्र पाहुनी चंद्रिका पण लाजल्या आपुल्या प्रणय क्रीडा पाहुनी चुंबिले ते ओष्ठ स्पर्श अजून मात्र राहिले तो मोगऱ्याचा  सुगंध अन तुझे ते मंत्र मुग्ध होऊन जाणे प्रणय रंगात रंगून जाऊन प्रणयात चिंब भिजून जाणे भिजलेल्या चिंब रात्री किती आठवीत राहिले पाहत रात्र संपून गेली धुंदी मात्र गंधित आहे भारलेले क्षण संपले अन ईतिहास मात्र ताजा आहे पहाट रात्री संपल्या किती आठवीत राहिले श्री प्रकाश साळवी दि. ०६ मे २०१४

सासुरवाशीण..!

सासुरवाशीण..! लई दिवस ग झाले आई तुझी आठवण येते, माघारीपणा पाठवा लवकर, मी माहेरपणा येते, * किती दिवस लोटले, मी सासरी ग आले, बरे आहेत न ग बाबा आठवणी माझ्या डोळा पाणी आले, * कशी आहेस ग वाहिनी, आता नाही माझा तुला त्रास, खर सांगते ग पण रोज अडखळतो ग घास, * दादा तुझी रे लाडकी, बहिण आली रे सासरी, आता नाही रे छळंनर तुझी लाडकी हि सोनपरी, * तुझ्या हाताची ग चव आई, आता कशी ग मिळणार, आता माझ्या मागे तुझी, भुण भुण ग कोण करणार? * लेक गेली का एकदा सासरी, आता माहेरची ग ती पाव्हणी, आई म्हणेल ग आता, लेक होती ग माझी गुणी, * श्री.प्रकाश साळवी दि. २० एप्रिल २०१४.

अतृप्त ..

अतृप्त .. तू चेतना चेतविल्या अन वासनांचा भडका उडाला दाह कायेला जाळीत होता अन तू मात्र निस्तब्ध शांत झाला * रात्र तरुण उशाशी प्रणयी गीत गायलासे तू छेडली तार अन संगीत झोपलासे * झाले जरी शांत शांत मन मात्र अस्वस्थ होई धुग धुग ही मनाची काय उफाळून येई ! श्री प्रकाश साळवी दि. २६ एप्रिल २०१४.  

आताच "शब्द" माझे

आताच "शब्द" माझे आताच "शब्द" माझे काहीतरी सांगून गेले आताच "शब्द" माझे अंतरंगी गूढ उकळून गेले शब्द एक मोठे धारदार शास्त्र आहे वापरले जपून ज्यांनी, कोडे त्यांचे उलगडून गेले शब्दात "अर्थ" सारे ठासून भारलेले ज्याने जसे वापरले त्यांचे "मंत्र" होऊन गेले शब्द एक शब्दाचा शब्दच भारी वाटे वापरले वजन "शब्दाचे" काम त्यांचे होऊन गेले शब्दास शब्द गेला वाढीव भांडणाचा शब्दास ज्यांच्या जपले त्यांनी ते "महात्मे" होऊन गेले श्री.प्रकाश साळवी दि. २८ एप्रिल २०१४.  

रे मना....

रे मना.... जाण तू स्वतःला तूच सर्व काही आहेस रे तूच खास तूच श्वास सर्व काही तुच रे * जागवी विश्वास स्वतःचा कमी न त्याला मान रे विश्वास देईल साथ मनाला अंतिम होईल साध्य रे * पराभवाने तू खचू नको तोल मनाचा ढळू नको रे यत्नाची तू शिकस्त कर माघार कधी तू घेऊ नको रे * मन हि अद्वैत शक्ती मनास सर्वस्व मान रे मनास आदेश मानुनी करी जागरूक मनास रे * मन परमात्मा मन शक्ती मोठी कर मन तुझे कणखर रे मन हेच अंतिम सत्य घे पारखून स्वतःच रे श्री. प्रकाश साळवी दि. ०३ मे २०१४.

रे तुझ्या वाचून येथले...

रे तुझ्या वाचून येथले... काय तू समजतोस स्वतःला मीच सर्व काही रे तुझ्या वाचून येथले काहीच अडणार नाही ! जी तुझ्या सवे राहिली "सावली" बनोनी रे तुझ्या वाचून ती एकटी पडणार नाही जमवतोस तू माया इथली पैका अडका रे तुझ्या वाचून ते सारे काय सडणार नाही ? जे केलेस कष्ट दिन-रात राब राबोनी रे तुझ्या वाचून वारस तुझे भांडणार नाही? जमविलेस  तू येथे सगे सोयरे मित्र जीवाचे रे तुझ्या वाचून ते तुझा ठाव-ठिकाणा पुसणार नाही? तू कोण कुणाचा शोध हा तू घेशील का? रे तुझ्या वाचून  कोणी "तू कोण?"  ते सांगणार नाही. श्री. प्रकाश साळवी दि. ०३ मे २०१४.

ते गेले कुठे?

ते गेले कुठे? ज्यांच्यासाठी तू दमला ते आहेत कुठे? जेंव्हा गरज तुला त्यांची ते गेले कुठे? जखमा उरात झेलत तू धावला तेंव्हा जखमेवर मीठ चोळण्या पाहिजे ते गेले कुठे? काट्याचे वार झेलुनी हृदय तुझे रक्ताळले हळुवार फुंकर मारण्या पाहिजे ते गेले कुठे? डोक्याला वसने गुंडालुनी लाज त्यांची तू राखली नग्न व्हायला आले तुझ्या नशिबी ते गेले कुठे? तोंडचे तू घास काढुनी भूक त्यांची भागविली खायला मिळे न तुजला तेंव्हा ते गेले कुठे? स्वार्थ बाजूस सारुनी जीव त्यांचे तू वाचविले परमार्थ करता तू आता ते गेले कुठे? श्री. प्रकाश साळवी दि. ०३ मे २०१४

प्राजक्त सडा

Image

मुक्त-मुक्ता

Image

तू परतताना

Image

गंध आणि फुल ...

Image

मी ते तुझीच राधा ..

Image

फुलताना कळीने ...!

Image

नमन माझे तव भास्करा ...!

Image

झरा ...!!

Image

कुणी सांगितले या मनाला ...

Image

चांदण्यांची आसवे ...?

Image

किती काळ आता जगायचेच आहे?

Image

स्वर ....

Image

या चांदण्यात तु ....

Image

गेले द्यायचे राहुनी !

Image

गेले द्यायचे राहुनी !

Image

विसरलीस ग तू?

Image

काय अर्थ याचा ?

काय अर्थ याचा ? तिरपा कटाक्ष तुझा अंन हलकेच तू हसावे, हलकाच स्पर्श तू मजला करावा,             काय अर्थ याचा मजला कळावा! दिसताच मी, तू सैर भैर व्हावे हलकेच पापण्यांचे जणू पंख व्हावे, हात ठेउनी वक्षावर मनी भाव हा वसावा,             काय अर्थ याचा मजला कळावा! जाता समोरुनी मी तू आरश्यात पाही, हात वारे करुनी मज खुणवावा             काय अर्थ याचा मजला कळावा! कधी नावासमोर तुझ्या, कधी माझेच नाव यावे, अर्थ तुझ्या मनीचा कोणा कसा कळावा,             काय अर्थ याचा मजला कळावा! का असेल का हि " प्रीत " तुझिया मनीची, काय संदेश तुझिया मनीचा मजला कळावा             काय अर्थ याचा मजला कळावा! कवी प्रकाश साळवी दि. १८ मार्च २०१४ दु. ३.०० वा

तुझ्या प्रीतीसाठी.....!

तुझ्या प्रीतीसाठी.....! तुझ्या प्रीतीसाठी किती मी झुरावे? तुझ्या प्रीतीचे मी किती इतिहास गावे?, तुझे ते मोकळे केस श्वास हा आश्वासक तुझ्या कौतुकाचे किती गोडवे मी गावे? तुझी "प्रेम पत्रे" उराशी मी जपावी, किती अर्थ त्यांचे, कुठे मी लपावे? तुझे गीत माझ्या हृदयी का सळावे? गीतास साथ माझी अन मला ना कळावे तुझे गोड शब्द कधी सत्य व्हावे? तुझे प्रेम सत्यात -हास्यात यावे, तुझी हास्यमुद्रा मनी कोंदणी ठसावी तुझे अंग - अंतरंग सर्व माझेच व्हावे, श्री प्रकाश साळवी दि. १८ मार्च २०१४ सकाळी ११.१० मी.

क्षण!

क्षण! जीवनात या क्षण येती  अन जाती, कधी हासविती अन कधी रडविती, क्षण सोन्याचे,क्षण चांदीचे, क्षण सुखाचे, क्षण दुःखाचे, मनास गुदगुल्या करणाऱ्या मखमालीचे, क्षण हास्याचे, क्षण रडण्याचे, क्षण आनंदाश्रुंचे, क्षण दुखाश्रुंचे, अलगद टपकणाऱ्या अळवावरचे, क्षण गाण्याचे, क्षण गुण-गुणण्याचे क्षण रंगाचे कधी बे-रंगाचे, मळवट पुसलेल्या विधवेच्या कपाळाचे, क्षण चीतारयाचे, कधी चिव-चिव चिमण्यांचे, कर्ण-कर्कश कावळ्याचे, क्षण वाळूचे, धड धड करणाऱ्या बिथरलेल्या ह्रदयाचे, क्षण वेदनांचे, संवेदनांचे, क्षण वायूंचे, क्षण आयुष्याचे, घन गर्जना करणाऱ्या गगनाचे, क्षण वादळाचे, क्षण पावसाचे, क्षण प्रेमाचे, क्षण विरहाचे, घोंगावणाऱ्या अवखळ वाऱ्याचे क्षण मोत्याचे, क्षण रत्नांचे, क्षण चांदण्याचे, क्षण चंद्रीकांचे, चम-चम लख लख करणाऱ्या सूर्याचे, क्षण वारयाचे , क्षण अग्नीचे, क्षण गवताचे, क्षण वादळाचे, थंड थंड हिरव्यागार गालिच्याचे, क्षण सणांचे, क्षण सल बोचण्याचे, क्षण धुंदींचे,क्षण बे-धुंदीचे, हवेत गिरक्या घेऊन भिर-भिरण्याचे, क्षण हत्तीचे, क्षण मुंगीचे, क्षण गुलाबाचे, क्षण गुंगीचे, धुंद होऊनी न

वणवा

वणवा रानात पेटलेला "वणवा" माझ्या मनात पेटला, का "षडरीपुंचा" संग्राम मनी माझ्या चालला, कल्लोळ करिती "राग-द्वेष" मनास देती यातना, कसे आवरावे हेच कळेना, धुडगूस यांनी घातला, क्षणोक्षणी हा "लोभ" धावे मन माझे त्याच्यासवे, मन माझे धावते, पण नाही शोध त्याचा थांबला. हे सुंदर जग सारे "मोहात" गुंतलो मी चिखलात गुंतला पाय माझा परी माझा मी भला, क्षणभंगुर सारे जीवन पण मी "मदाने" भारलो, कोणी नसे मज सारखा असा मज भ्रम जाहला, घोंगावती मक्षिका या "मत्सर" माझ्या मनी, रामे तिने धाडिले वनी, मत्सराने त्याचा घात केला, षडरिपुंना आवरण्या बळ देई हे दयाघना, कसे आवरू या रिपुंना, का येई ना तुज कळवला ? ना सोडिले या षडरिपुंनी कोणा कोणासही , "नामात" दंग होऊनी घोट षडरुपुंनी घेतला, श्री प्रकाश साळवी दि. १६ मार्च २०१४ दु. ११.४० 

प्रतीक्षा!

प्रतीक्षा! दारात उभी राहून दूर दूर , कोणासाठी झाली आहेस आतुर, हे प्रिये! तुझा प्रियकर कधी येणार आहे!               चंचल होऊन कधी आंत               अन कधी बाहेर,               किती आतुर तू               कवणाची पाहत वाट, कमरेवर हात ठेउनी खालचा ओठ दुमडूनी, नयन थकले वाट पाहुनी, कधी - कधी तू येणार आहे,             डोळ्यात माझ्या तुझीच मूर्ती,             तूच मन माझे, अन तूच स्फूर्ती,             दोन चक्षुची आरती,            पण, तू कधी येणार आहे, दिसलास जरी कधी एकदा, नाही अलविदा - नाही अलविदा, झाले तुजवर मी फिदा, सर्वस्वाने मी तुझीच आहे, कवी प्रकाश साळवी दि. १५ मार्च २०१४ दु. २.२०

मसणवटा !!

मसणवटा !! एक मढे ! पांढऱ्या कापडात गुंडाळलेले , तोंडात "तुळशीपत्र" तरीही "मी" म्हणतोय; आजूनही "मी" पणा सोडवत नाही! जन्माला आला तेंव्हा हसवले सर्वांना , आणि रडवले "माय" ला! जाताना रडवित गेला सर्वांना , हसला मात्र (मनात) पूत; कारण..... मरेपर्यंत अन्नान्न करीत ठेवले, अन आता "केसांचे" दान करून, पुण्य पाडून घेतोय पदरात! आता मी याचा वारस, म्हणून, मनात आनंदला अन जाळा म्हणतो याला लवकर, तिकडे "नाभिक" वस्तारा पारजतोय, कर मुंडी समोर, भादरतो तुझे केस, मानधन माझे तेव्हढे दे, म्हणतोय, पीठाचे गोळे करून "पींड" पाडणारे गुरुजी, तोंडाने मंत्रांचे पठन, आणि मनात "दक्षिणेची" आठवण ! सगे-सोयरे मख्ख चेहरा करून बसलेत आजूबाजूला, म्हणतात सुटलो याच्या, जाचातून, देण त्याच नाही त्यांना आठवत, काव-काव करीत कावळ्या सारखे आरे उरका जर लवकर, म्हणत, एक दिवस आपल्यालाही येथेच यायचे आहे! आला एकटा आणि जाणारही एकटाच असा हा "मसणवटा" स्वरचित श्री. प्रकाश साळवी. दि. १३ मार्च २०१४, सकाळी ११.२० मी.

वेदना

वेदना का उफाळून येती या वेदनांच्या जाणीवा ! का काट्याला कळेल काय अर्थ याचा नवा ! भळभळती वेदना आणि रक्ताळल्या भावना, उष्ण-उन चांदणे, अन शीत सुर्य नवा नवा, आर्त - धुंद वेदना अन धुंद - धुंद आसवे, ओघळले रक्ताचे अश्रू, अन अनुभव हा हवा हवा, कुणी घालील काय फुंकर, या वेदनेची जात नवी, स्पंदन - कंपन - रुदन , अन वेदनेचा जोश नवा, स्वरचित - > श्री प्रकाश साळवी. दिनांक - ०९-०३-२०१४ वेळ सकाळी ११.३०

भावपूजा !!

भावपूजा !! त्या तुझिया चिंतनात, शब्दफुले मज वाहू दे, तव नामात दंग होऊनी तव कीर्तनात नाचुदे, सावळे ते रूप तुझे, शब्द रंगात रंगवु दे, शब्दात रंगलेले रूप तुझे, मज ह्रिदयि साठवू दे, शब्द टाळ वाजवुनी भजनात तुझ्या गुंग होवू दे, नाम तुझे घेता घेता शब्द माझे "नाम" होवू दे, एक एक शब्द घेवूनी, शब्दमाला गुंफू दे, शब्दमाला तुज अर्पुनी तव चिंतनात रंगू दे, शब्द फुलांची "भावपूजा" हि, गोड मानुनी अर्पू दे, शब्दरूपी "नाम" घेता घेता, अखंड नाम तव चरणी राहू दे, स्वरचित : श्री प्रकाश साळवी

बाजार (नात्या-गोत्यांचा)

बाजार (नात्या-गोत्यांचा) निशःब्द भावनांचा बाजार मांडला हा, कट्या-कूट यांचा संसार मांडला हा, आयुष्य जाळूनी जगतो उगाच मी, नात्यांमध्ये दुरावा, कधी वाढतो हा, सारे सुखाचे सोबती, न दुः खात साथ देती, परी वेदनांचा वणवाच पेटतो हा, निस्वार्थ - त्याग शब्द हे "कोशातले", लवलेश त्यांचा न कोठे दिसे हा, चौकडीतली हि नाती, ना भाऊबंदकी हि, दीड दमडीचा मांडला पसारा हा, फसवीच नाती,फसवीच गोती, दिखावाच सारा, नात्या-गोत्याचा हा, मरणात त्यांच्या किती "आसवे" ढाळती  हे, सरणावर जळताच "वाट्यास" भांडती हे, स्वरचित : कवी प्रकाश साळवी 

कशी विसरू ग तुझी माझी प्रीत!!

कशी विसरू ग तुझी माझी प्रीत!! कशी विसरू ग तुझी माझी प्रीत कसे विसरू आपले प्रेमगीत विसरलीस तू जरी, नाही विसरलो मी तुला, शब्दात बांधून ठेविले मी तुला हसतेस जरी तू तिथे मी मात्र वेडा इथे, किती आठवणी, आणि मन माझे तिथे, हृदयावर ठेवून धोंडा गेलीस तू निघून, पाहून घायाळ मी, गेलीस तू इथून, विसरणे सोपे नसते ग "खरी प्रीत" विश्वास नाही मला, "माधुरी" हीच का तुझी रीत, पाहीन वाट तुझी या जन्मी जरी ना भेटली तू अनंत जन्म घेईन मी तुज साठी, भेटू आपण मी आणि तु. *****-> स्वरचित प्रकाश साळवी 

शोध कश्याचा...!

Image

अनोखे प्रेम..!

Image

ओठ...!

Image

ओठ...!

Image

तू नेहमीच..!

Image

वेळूच्या बनत !!!

Image

कातरवेळी !

Image

कातरवेळी !

Image

प्रेमाचा दिवस [व्यालेनटाइन डे]

प्रेमाचा दिवस [व्यालेनटाइन डे] [सर्व प्रथम प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची माफी मागतो. कारण त्यांची पण अशीच एक कविता आहे. पण हा माझा केविलवाणा प्रयत्न आहे.] ** प्रेम कुणीही कुणावर करावे.. पण .. त्यात नसावा स्वार्थ ..निर्व्याज, निष्पाप .. असावे प्रेम प्रेम फुलांवर करावे, प्रेम पानावर करावे, प्रेम फुलपाखरावर करावे, प्रेम मुलांवर करावे, प्रेम दुसऱ्यावर करावे, प्रेम स्वतःवर करावे, प्रेम पावसावर करावे, प्रेम गवतावर करावे, गवतावरच्या दवावर करावे, प्रेम रानफुलावर करावे, प्रेम काळ्या मातीवर करावे, प्रेम आईवर करावे, वडिलांवर करावे, साऱ्या कुटुंबावर करावे, प्रेम भावावर करावे, बहिणीवरही प्रेम करावे, "सुंदर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर प्रेम करावे," प्रेम देवावर करावे, भक्तीवर करावे, मन बहरून टाकणाऱ्या सुगंधावर करावे, स्वतः जळून दुसऱ्यास प्रकाश देणाऱ्या, ज्योतीवर करावे, प्रेम प्रेमावर करावे, प्रेम कुणीही कुणावर करावे, निरागस बालकांवर करावे,प्रेम अनाश्रीतावर करावे, आश्रीतावर करावे, प्रेम उन्हातान्हात राबणाऱ्या रांगड्या कामकारयावर करावे, प्रेम मध माश्यांवर करावे,

शोधतो आहे माणुसकी !!!

शोधतो आहे माणुसकी !!! शोधतो आहे माणूस ज्यात माणुसकी शिल्लक आहे. शोधतो आहे माणुसकी ज्यात माणूस शिल्लक आहे. जिकडे तिकडे श्वापदेच भरली आहेत, वासनेचा चाललेला नंगा नाच ना नात्याचा घरबंध, ना माणुसकीचा वास, जगतो आहे फक्त म्हणून चालू आहे श्वास, कोवळे देह होताहेत वासनेचे बळी, कुस्करल्या कित्येक काळ्या, नाहक जाताहेत बळी, दिखावा फक्त "माणुसकीचा", आतून माणुसकीचा अंत न नात्याची-ना-माणूस असल्यची खंत, कुणी दाखवाल का हो माणुसकी काय असते? उघडा डोळे, पहा निट माणुसकी कोठे दिसते? "बीइंग ह्युमन" म्हणून माणसा! माणुसकी सापडणार नाही, माणसा मधला खरा खुरा माणूस जागा होईल तेंव्हा एकही नराधम राहणार नाही. स्वरचित : श्री प्रकाश साळवी.