क्षण!

क्षण!

जीवनात या क्षण येती  अन जाती,
कधी हासविती अन कधी रडविती,
क्षण सोन्याचे,क्षण चांदीचे,
क्षण सुखाचे, क्षण दुःखाचे,
मनास गुदगुल्या करणाऱ्या मखमालीचे,
क्षण हास्याचे, क्षण रडण्याचे,
क्षण आनंदाश्रुंचे, क्षण दुखाश्रुंचे,
अलगद टपकणाऱ्या अळवावरचे,
क्षण गाण्याचे, क्षण गुण-गुणण्याचे
क्षण रंगाचे कधी बे-रंगाचे,
मळवट पुसलेल्या विधवेच्या कपाळाचे,
क्षण चीतारयाचे, कधी चिव-चिव चिमण्यांचे,
कर्ण-कर्कश कावळ्याचे, क्षण वाळूचे,
धड धड करणाऱ्या बिथरलेल्या ह्रदयाचे,
क्षण वेदनांचे, संवेदनांचे,
क्षण वायूंचे, क्षण आयुष्याचे,
घन गर्जना करणाऱ्या गगनाचे,
क्षण वादळाचे, क्षण पावसाचे,
क्षण प्रेमाचे, क्षण विरहाचे,
घोंगावणाऱ्या अवखळ वाऱ्याचे
क्षण मोत्याचे, क्षण रत्नांचे,
क्षण चांदण्याचे, क्षण चंद्रीकांचे,
चम-चम लख लख करणाऱ्या सूर्याचे,
क्षण वारयाचे , क्षण अग्नीचे,
क्षण गवताचे, क्षण वादळाचे,
थंड थंड हिरव्यागार गालिच्याचे,
क्षण सणांचे, क्षण सल बोचण्याचे,
क्षण धुंदींचे,क्षण बे-धुंदीचे,
हवेत गिरक्या घेऊन भिर-भिरण्याचे,
क्षण हत्तीचे, क्षण मुंगीचे,
क्षण गुलाबाचे, क्षण गुंगीचे,
धुंद होऊनी नाचत नाचत गाण्याचे,
असेच अनेक क्षण
येणारे क्षण जाणारे क्षण
जतन करून ठेवा; कारण हेच आपले जीवन!!

श्री प्रकाश साळवी दि. १६ मार्च २०१४ संध्या ०५.२५ मी.

Comments