शोधतो आहे माणुसकी !!!

शोधतो आहे माणुसकी !!!

शोधतो आहे माणूस ज्यात माणुसकी शिल्लक आहे.
शोधतो आहे माणुसकी ज्यात माणूस शिल्लक आहे.
जिकडे तिकडे श्वापदेच भरली आहेत,
वासनेचा चाललेला नंगा नाच
ना नात्याचा घरबंध, ना माणुसकीचा वास,
जगतो आहे फक्त म्हणून चालू आहे श्वास,
कोवळे देह होताहेत वासनेचे बळी,
कुस्करल्या कित्येक काळ्या, नाहक जाताहेत बळी,
दिखावा फक्त "माणुसकीचा", आतून माणुसकीचा अंत
न नात्याची-ना-माणूस असल्यची खंत,
कुणी दाखवाल का हो माणुसकी काय असते?
उघडा डोळे, पहा निट माणुसकी कोठे दिसते?
"बीइंग ह्युमन" म्हणून माणसा! माणुसकी सापडणार नाही,
माणसा मधला खरा खुरा माणूस जागा होईल तेंव्हा
एकही नराधम राहणार नाही.

स्वरचित : श्री प्रकाश साळवी.

Comments

Popular posts from this blog

गीत ऐक्याचे ।