Posts

Showing posts from August, 2014

तुझे भास पावसाचे(2)

तुझे भास पावसाचे तुझे भास पावसाचे जणू फूलावी जाई-जूई थेंबात पावसाच्या प्रीत आपुली फूलून येई ।।1।। तुझे भास पावसाचे शब्द हे भरून यावे गाणे माझ्या मनातले हलकेच जूळून यावे  ।।2।। तुझे भास पावसाचे स्वप्नी तूच यावे प्रीतीत पावसाच्या चिंब भिजून जावे ।।3।। तुझे भास पावसाचे मातीस गंध फूलांचा प्रितीस गंध यावा तूझ्या अनोख्या साहसाचा ।।4।। तुझे भास पावसाचे भासते तू आसपास येई पुन्हां फिरोनी तोडून सर्व पाश ।। 5।। श्री. प्रकाश साळवी, दि.24/08/2014

स्री (दिवाळी अंकात त्रृतीय क्रमांक)

स्री परमेश्वराने जेंव्हा बनविली स्री, एक चिरंतन, धगधगीत जीवंत शील्प, मूर्तीमंत सौंदर्य, औदार्य मान, जाज्वल्य स्वाभिमान सोशिकता, सात्विकता आणि त्याच बरोबर दिली धगधगती आग, ती कधी आसते "आई" कधी असते ताई कधी असते धमॆ-पत्नी कुळास कुळवंत करणारी स्वत:च्या शीलास जपणारी तर कधी असते आदिशक्ती-आदीमाया साऱया कुळासाठी व्रत वैकल्ये करणारी, स्वत: झिजून, कुळासाठी मरणारी तर कधी असते रण-रागिणी; रक्ताचे घोट घेणारी भडकती आग; क्षणात जाळून भस्म करणारी काली, अंबा, जगदंबा जिथे स्रीला मान-सन्मान त्या घरात असतो स्वाभिमान जिथे स्रीत्वाचा "अपमान" ते सारेच "बेईमान" तरीही आज का "भ्रूणहत्या" होत आहे? तिला जन्माआधिच संपविली जात आहे अरे वेड्यांनो जरा सावध व्हा! मुलीचं स्वागत करा तिथेच रूजेल माया-प्रेम आणि स्रीलाच दिलेत देवाने अश्रूंचे वरदान तुमच्यासाठी ती ढाळेल आपले अश्रू नका करू तिच्या अश्रूंचा अपमान शेवटी "स्रीच" आहे तुमचा प्राण श्री. प्रकाश साळवी, बदलापूर - ठाणे दि.22/08/2014.

** वीरक्त प्रवास **

** वीरक्त प्रवास ** गेले ते दिवस फूलायचे होते आताचे ते झुरायचे आहेत केलेल्या कृतींचे प्रायश्चीत्त आता ते भोगायचे आहे! चालताना वाट वळणाची सरळ वाटली होती निसटला पाय तेव्हा आता घसरायचे आहे! केला प्रवास चूकीचाच होता नशीबीच आता तडपायचे आहे! वृथा खर्च केला चूकीच्या गतीने शक्तीहीन आता बसायचे आहे! घेऊन कूंचले रंग सोबतीला चितारले चित्र रंगहीन मी वीरक्त जीवनाचे चित्र आता रंगवायचे आहे! श्री.प्रकाश साळवी, दि. 20/08/2014

राखेतले निखारे

राखेतले निखारे ऊठा रे ऊठा आता चेतून ऊठा रे मी चेतवितो आता राखेतले निखारे किती साहणार अन्याय आता गोठले रक्त आता दिशाहीन सारे पून्हा पेटवा रे क्रांतीच्या मशाली पून्हा सज्ज व्हा रे लढा लढण्यास सारे सारेच मर्द तूम्ही छाती तूमची पत्थराची कथा या क्रांतीची दाखऊन द्या रे श्री. प्रकाश साळवी, दि.21/08/2014

तुझे भास पावसाचे

तुझे भास पावसाचे तुझे भास पावसाचे आणी मनी शहारे तुझे संकेत मिलनाचे समजून घे इशारे       -०- तुझे भास पावसाचे प्रीती चिंब भिजून जावी या थंड गारव्यात तू जवळी असावी       -०- तुझे भास पावसाचे हूड हुडी मनी भरावी पंखात पंख मिळवूनी मिठीत रात्र जावी       -०- तुझे भास पावसाचे दूर भासतो किनारा लाटेत सागराच्या तो मन-मोही दरारा       -०- तुझे भास पावसाचे जागवी मनी त्या भावना शहारून अंग यावे तुझ्या मिलनाच्या कल्पना       -०- श्री प्रकाश साळवी दि. १९ ऑगस्ट २०१४.    

शोधतो वाटा पुन्हा...

शोधतो वाटा पुन्हा... शोधतो वाटा पुन्हा त्या ज्या कधी चाललोच नाही सोसतो चटके ऊन्हाचे जे कधी सोसलेच नाही धाडस केले मी कंटकावर चालण्याचे फूलांत रमण्याचे कधी रूचलेच नाही आणले तूजसाठी खूडून फूल सोनचाफ्याचे मोकळ्या केसात तूझ्या ते खोचलेच नाही शोधित राहीलो सुख भवती भव-सागरात स्वतःत सुख शोधण्याचे कधी सुचलेच नाही खेळलो सुगंधात, रमलो गुलाब पुष्पात मजेने हासलो किती हौसेने, काटे कधी टोचलेच नाही आयुष्य वेचताना धडपडलो कितीदातरी जखमा ऊरी ज्या जाहल्या किती? ते  समजलेच नाही आजपावेतो दू:ख सोशीत आलो सुखाने भोग भोगण्याचे तरीही अजून संपलेच नाही श्री. प्रकाश साळवी.  दि.14 ऑगस्ट 2014.

आठवणी

आठवणी विसरू पहाता सारे, परी विसरता येत नाही घडल्या क्षणांच्या पाऊलखूणा पुसता येत नाही केला प्रवास कधी सुखाने, कधी आडवाटेने चाल चालता रूळल्या वाटा, मोडता येत नाही लिहीला ईतिहास क्षणांनी सुखद आठवणींचा कितीही क्रूर असता तरीही पुसता येत नाही साठविले आठवणींचे ढिगारे चांगले-वाईट ऊपसता काही केल्या संपविता येत नाही तोडले धागे आयुष्यात, मात्र आठवणी राहिले जोडू पाहता या धाग्यांना जोडता येत नाही वाटले काही चांगले घडावे या जीवनी निसटले ते क्षण पुन्हां पुन्हां येत नाही मेघ दाटून येती आठवणींच्या जलाचे यत्ने बरसता नयनी बरसता येत नाही श्री. प्रकाश साळवी,  दि.30-07-2014.

आला श्रावण ...

आला श्रावण ... आला श्रावण आला श्रावण करू या सुखाची ऊधळण हरीत त्रूणाची करूनी पखरण साजरे करू या आपण सारे जण ---  श्री. प्रकाश साळवी दि. 27/07/2014

आला श्रावण

आला श्रावण धो धो पाऊस घोंगावणारा वारा भरून वहाणारया नद्या फेसाळ लाटांचा किनारा  -1- अथांग सागर दूरवर दिसे गलबत मनात भितीचे काहूर मनाचे मनाशी खलबत -2- खोल खोल दरी झुळझुळ वाहे निर्झर संथ संथ आहे बाजूचे हे सरोवर -3- प्राजक्ताचा सडा मंद मंद शितल पवन फुलून आले सारे अंगण सुगंधीत झाले सारे मन -4- नेसुन हिरवा शालू आला श्रावण, आला श्रावण कधी थोडी शिर शिर चोहीकडे आनंदाचे क्षण -5- श्री. प्रकाश साळवी. दि. 04-08-2014 www.prakashsalvi1.blogspot.in