आठवणी

आठवणी

विसरू पहाता सारे, परी विसरता येत नाही
घडल्या क्षणांच्या पाऊलखूणा पुसता येत नाही

केला प्रवास कधी सुखाने, कधी आडवाटेने
चाल चालता रूळल्या वाटा, मोडता येत नाही

लिहीला ईतिहास क्षणांनी सुखद आठवणींचा
कितीही क्रूर असता तरीही पुसता येत नाही

साठविले आठवणींचे ढिगारे चांगले-वाईट
ऊपसता काही केल्या संपविता येत नाही

तोडले धागे आयुष्यात, मात्र आठवणी राहिले
जोडू पाहता या धाग्यांना जोडता येत नाही

वाटले काही चांगले घडावे या जीवनी
निसटले ते क्षण पुन्हां पुन्हां येत नाही

मेघ दाटून येती आठवणींच्या जलाचे
यत्ने बरसता नयनी बरसता येत नाही

श्री. प्रकाश साळवी,  दि.30-07-2014.

Comments