** वीरक्त प्रवास **

** वीरक्त प्रवास **

गेले ते दिवस फूलायचे होते
आताचे ते झुरायचे आहेत
केलेल्या कृतींचे प्रायश्चीत्त
आता ते भोगायचे आहे!

चालताना वाट वळणाची
सरळ वाटली होती
निसटला पाय तेव्हा
आता घसरायचे आहे!

केला प्रवास चूकीचाच होता
नशीबीच आता तडपायचे आहे!
वृथा खर्च केला चूकीच्या गतीने
शक्तीहीन आता बसायचे आहे!

घेऊन कूंचले रंग सोबतीला
चितारले चित्र रंगहीन मी
वीरक्त जीवनाचे चित्र
आता रंगवायचे आहे!

श्री.प्रकाश साळवी, दि. 20/08/2014

Comments