Posts

Showing posts from July, 2014

मी तुझ्या चरणीची धूळ...!

थोडे गंध, थोडी फुल , मी तुझ्या चरणीची  धूळ, करू दे थोडी पूजा तुझी, एवढीच आहे आस माझी, नाही मजकडे अक्षदा - जल वाहू का रे नयनिचे अश्रुजल? नाही मजकडे वहान्या हार पुष्प, गोड मान हे माझे हे शब्द पुष्प, तू आहेस अनादी अनंत तुझ्या पूजने मन होई शांत, नाही मजकडे रे कापूर आरती जाळीन माझे तन तुजसाठी मी अज्ञानी, कशी करू तुझी पूजा ? क्षमा करी मज देवा, मी आहे तुझा. श्री प्रकाश साळवी, दि. २१-०७-२०१४

सुखात माझ्या,,,

सुखात माझ्या तुझा मोठा हात आहे सरळ चालताना सुद्धा तुझीच साथ आहे, नसताना तू सोबतीला, विरहिणी गायिल्या मी सोबतीने तुझ्या मी, सुखाचे गीत गात आहे भिजलो कितीदा तरी मी कोरडाच होतो, प्रीतीच्या तुझ्या जलाशयात मी न्हात आहे, शोधीत होतो तुला मी हर प्रकारे, हा गुन्हा माझा मी का लपवित आहे? नशापान केले तरी मी झिंगलो नाही कधीही प्राशिले काय तू मजला, पुरता मी धुंदीत आहे, निद्रेवीना या अशा किती रात्री गेल्या, आता खरा मी तुझ्या प्रीतीत आहे, चाली केल्या कित्येकदा मी बुद्धीबळाच्या अखेर तूच मजवर केलीस मात आहे, श्री. प्रकाश साळवी दि. २१/०७/२०१४

पाऊस कधीचा पडतो..

पाऊस कधीचा पडतो.. ================= घन गर्जत आले मेघ पाण्याचे टपोरे थेंब पाऊस कधीचा पडतो, मन झाले ओलेचिंब    = १ = झाली धरणी शांत शांत मेघ आले बरसत पाऊस कधीचा पडतो कृषीवल झाला निवांत  = २ = रस्त्यावर झाले पाणी टळेल का आता  पाणीबाणी? पाऊस कधीचा पडतो आता नको हुलकावणी  = ३ = पावसाचे झाले आगमन पुलकित झाले तन मन पाऊस कधीचा पडतो आनंद झाला मनोमन = ४ = श्री प्रकाश साळवी दि १२ जुलै २०१४

सुख-दुखः

हल्ली सुखाचा मी शोध घेत नाही दू:खाचे रडगाणे हल्ली मी गात नाही हलकेच सुख येते, वाकूल्या दाखवून जाते बरे नसे हे, सुखाची ही रीत नाही जगण्यात सुख मोठे, म्हणून गित गावे गाण्यात रमताना सुखासारखे गित नाही थोडे सुखासी जमवून घ्यावे अन् दू:खाची फारकत खरेच समजावे ही सुखाची जीत नाही सारेच येथे असती सुखाचे सोबती कोणी नसे जीवाचा येथे कोणी कुणाचा मीत नाही चिखलात गुलाब फूलावे , काट्यात कमलपुप्षे अशी जगाची जनरीत नाही येणार सुख वा दू:ख खुशाल येवो जगण्यात सारे मग्न येथे दू:खास कोणी भीत नाही श्री प्रकाश साळवी दि. 09/07/2014

दिंडी चालली....

दिंडी चालली.... टाळ मृदुंगाची साथ मुखी हरी नामाची हाक निघाली दींडी पायी पायी येथे न लाजती राव रंक ध्यास विठू माऊलीचा रखुमाई विठूरायाचा नाचू गाऊ आनंदे काय वर्णू सोहळा किर्तनाचा जशी माय वाहे गोदा गंगा पंढरपूरी वाहे चंद्रभागा तूझ्या दर्शनाची लागे ओढ कधी भेटशी रे पांडूरंगा? दींडी चालली चालली गोडी विठ्ठल नामाची लागली ना देहाला शिण भाग दींडी विठूरायाची चालली श्री. प्रकाश साळवी दि. 4-जूलै 2014

** मरणाने शिकविले जगणे आम्हाला !

** मरणाने शिकविले जगणे आम्हाला ! मरणाने शिकविले जगणे आम्हाला जिवन जगणे मरण आम्हाला धमन्यात रक्त होते शूरपणाचे नशिबी आले गांडूगीरीचे जीणे आम्हांला ताठ कणा आणि कणखर बाणा मराठी बोलण्याची लाज वाटते आम्हाला घेऊन मरण खांध्यावरती जगतो येथे जगणे जगून बघतो इथे आम्हाला रोज मरे त्याला रोज कोण रडे रोजचेच जगणे मरणप्राय आम्हाला झगडतो रोज मरणाशी जगण्यासाठी ओलीस ठेवले जगण्याने आम्हाला बाजार मांडला जगण्याचा आम्ही विकून टाकले मरणाने आम्हाला गणित मांडतो जगण्याची आम्ही शून्याने भागितले मरणाने आम्हाला श्री प्रकाश साळवी दि 29-06-2014

तू माझी कोण ?

तू माझी कोण ? तु माझी कोण असणार नाही ते प्रेम आता दिसणार नाही गंध फुलांनी पसरून गेला मी मात्र आता गंधणार नाही जे दिले ते सर्व तू घेऊन जा जे घडले ते सर्व विसरणार नाही भेट तूझी माझी होणार नाही भेटलीस कदाचीत तरी पहाणार नाही केली असेल मी तूझ्याशी प्रीत ग या पुढे सर्व मी ते आठवणार नाही आणली थोडी फुले ही घेऊन जा माळलास गजरा तरीही मी पाहणार नाही शब्द सारे तूझे ते विसरून जा शब्दांशी मी आता मी खेळणार नाही श्री.प्रकाश साळवी दि.21 जून 2014

शोध घे रे माणसा !

शोध घे रे माणसा ! शोध घे रे माणसा तू कोण आहे फुलते  काट्यात जीणे साच आहे जीवनाला सुख थोडे लाभलेले आणि दुखाःची भरुनी खाण आहे आज स्वप्नांनी फसवीले तरीहि स्वप्न का रे जीवनी प्रमाण आहे? भोगतो दुखः इतुके सुखाची मात्र आस का? सापडले जरी सुख थोडे, दुखाःस मात्र कारण आहे कर तू जरासे थोडे काही चांगले जग चांगल्यांचे बाकी सारे विराण आहे शोध घे तू तुझ्या जन्मास काय प्रयोजन? शोध घे तू निर्मात्याचा, हेच ते तारण आहे ध्यास घे तू प्रभूचा आहे तो जगतांतरी ओळख प्रभूला तुम्ही, जन्माला त्याला मरण आहे श्री. प्रकाश साळवी दि. १९ जून २०१४ 

ती.....

ती..... रोज सकाळी ती हसुन गाणे गाते मला पाहता तिची कळी खुलते डोळ्यात भावनांचा कळ्ळोल दिसावा नयानांचे शर ती मागे सोडून जाते गाण्यात तिच्या कधी प्रीत फुलावी बरसात फुलाची ती करून जाते केस मोकळे तिचे कधी पक्षी बनती हलकेच मोगऱ्याची ती वेणी माळते चंचलतेने ती कधी झाडी अंगण अंगणात कधी तीची प्रीती फुलते दिसताच तिच्या समोर पहावे नखरे लाज लाजूनी ती अल्लड हसते श्री प्रकाश साळवी दि १८ जून २०१४

वीरह गीत !!

वीरह गीत !! गायचे नव्हते तरी तू सूर का लावला नाही म्हणायचेच होते तरी तू जीव का लावला? जागेपणी मी स्वप्नात रंगलो उडू लागलो म पंखाविना गंध फुलांचे नव्हते तरी सुगंध येऊ लागला पुष्पविना जगणे जगावे वाटताना श्वास तू का कोंडला?   ||१|| श्वास घेता परी श्वास तू प्रत्यक्ष श्वास होऊन राहिली सारे जगाचे विसरून भान मी फुलापरी फुलताना मी पहिली प्रीत फुलू लागताना रंग तू का लावला?  ||२|| शिशिरातही दिवस फुलताना आनंद दाटू लागले वसंतातले यौवन सारे मी फुलताना पाहिले भरमार होऊन भ्रमताना गंध तू का लावला?  ||३|| श्री. प्रकाश साळवी दि. १० मे २०१४