शोध घे रे माणसा !

शोध घे रे माणसा !

शोध घे रे माणसा तू कोण आहे
फुलते  काट्यात जीणे साच आहे

जीवनाला सुख थोडे लाभलेले
आणि दुखाःची भरुनी खाण आहे

आज स्वप्नांनी फसवीले तरीहि
स्वप्न का रे जीवनी प्रमाण आहे?

भोगतो दुखः इतुके सुखाची मात्र आस का?
सापडले जरी सुख थोडे, दुखाःस मात्र कारण आहे

कर तू जरासे थोडे काही चांगले
जग चांगल्यांचे बाकी सारे विराण आहे

शोध घे तू तुझ्या जन्मास काय प्रयोजन?
शोध घे तू निर्मात्याचा, हेच ते तारण आहे

ध्यास घे तू प्रभूचा आहे तो जगतांतरी
ओळख प्रभूला तुम्ही, जन्माला त्याला मरण आहे

श्री. प्रकाश साळवी दि. १९ जून २०१४ 

Comments