तू माझी कोण ?

तू माझी कोण ?

तु माझी कोण असणार नाही
ते प्रेम आता दिसणार नाही
गंध फुलांनी पसरून गेला
मी मात्र आता गंधणार नाही
जे दिले ते सर्व तू घेऊन जा
जे घडले ते सर्व विसरणार नाही
भेट तूझी माझी होणार नाही
भेटलीस कदाचीत तरी पहाणार नाही
केली असेल मी तूझ्याशी प्रीत ग
या पुढे सर्व मी ते आठवणार नाही
आणली थोडी फुले ही घेऊन जा
माळलास गजरा तरीही मी पाहणार नाही
शब्द सारे तूझे ते विसरून जा
शब्दांशी मी आता मी खेळणार नाही

श्री.प्रकाश साळवी दि.21 जून 2014

Comments

Popular posts from this blog

गीत ऐक्याचे ।