सुखात माझ्या,,,

सुखात माझ्या तुझा मोठा हात आहे
सरळ चालताना सुद्धा तुझीच साथ आहे,

नसताना तू सोबतीला, विरहिणी गायिल्या मी
सोबतीने तुझ्या मी, सुखाचे गीत गात आहे

भिजलो कितीदा तरी मी कोरडाच होतो,
प्रीतीच्या तुझ्या जलाशयात मी न्हात आहे,

शोधीत होतो तुला मी हर प्रकारे,
हा गुन्हा माझा मी का लपवित आहे?

नशापान केले तरी मी झिंगलो नाही कधीही
प्राशिले काय तू मजला, पुरता मी धुंदीत आहे,

निद्रेवीना या अशा किती रात्री गेल्या,
आता खरा मी तुझ्या प्रीतीत आहे,

चाली केल्या कित्येकदा मी बुद्धीबळाच्या
अखेर तूच मजवर केलीस मात आहे,

श्री. प्रकाश साळवी दि. २१/०७/२०१४

Comments