सुख-दुखः

हल्ली सुखाचा मी शोध घेत नाही
दू:खाचे रडगाणे हल्ली मी गात नाही

हलकेच सुख येते, वाकूल्या दाखवून जाते
बरे नसे हे, सुखाची ही रीत नाही

जगण्यात सुख मोठे, म्हणून गित गावे
गाण्यात रमताना सुखासारखे गित नाही

थोडे सुखासी जमवून घ्यावे अन् दू:खाची फारकत
खरेच समजावे ही सुखाची जीत नाही

सारेच येथे असती सुखाचे सोबती
कोणी नसे जीवाचा येथे कोणी कुणाचा मीत नाही

चिखलात गुलाब फूलावे , काट्यात कमलपुप्षे
अशी जगाची जनरीत नाही

येणार सुख वा दू:ख खुशाल येवो
जगण्यात सारे मग्न येथे दू:खास कोणी भीत नाही

श्री प्रकाश साळवी दि. 09/07/2014

Comments