मी तुझ्या चरणीची धूळ...!

थोडे गंध, थोडी फुल ,
मी तुझ्या चरणीची  धूळ,

करू दे थोडी पूजा तुझी,
एवढीच आहे आस माझी,

नाही मजकडे अक्षदा - जल
वाहू का रे नयनिचे अश्रुजल?

नाही मजकडे वहान्या हार पुष्प,
गोड मान हे माझे हे शब्द पुष्प,

तू आहेस अनादी अनंत
तुझ्या पूजने मन होई शांत,

नाही मजकडे रे कापूर आरती
जाळीन माझे तन तुजसाठी

मी अज्ञानी, कशी करू तुझी पूजा ?
क्षमा करी मज देवा, मी आहे तुझा.

श्री प्रकाश साळवी, दि. २१-०७-२०१४

Comments

Popular posts from this blog

गीत ऐक्याचे ।