स्री (दिवाळी अंकात त्रृतीय क्रमांक)

स्री

परमेश्वराने जेंव्हा बनविली
स्री, एक चिरंतन, धगधगीत
जीवंत शील्प,
मूर्तीमंत सौंदर्य, औदार्य
मान, जाज्वल्य स्वाभिमान
सोशिकता, सात्विकता
आणि त्याच बरोबर दिली
धगधगती आग,
ती कधी आसते "आई"
कधी असते ताई
कधी असते धमॆ-पत्नी
कुळास कुळवंत करणारी
स्वत:च्या शीलास जपणारी
तर कधी असते
आदिशक्ती-आदीमाया
साऱया कुळासाठी
व्रत वैकल्ये करणारी,
स्वत: झिजून, कुळासाठी मरणारी
तर कधी असते
रण-रागिणी; रक्ताचे घोट घेणारी
भडकती आग; क्षणात जाळून
भस्म करणारी
काली, अंबा, जगदंबा
जिथे स्रीला मान-सन्मान
त्या घरात असतो स्वाभिमान
जिथे स्रीत्वाचा "अपमान"
ते सारेच "बेईमान"
तरीही आज का "भ्रूणहत्या"
होत आहे?
तिला जन्माआधिच
संपविली जात आहे
अरे वेड्यांनो
जरा सावध व्हा!
मुलीचं स्वागत करा
तिथेच रूजेल माया-प्रेम
आणि स्रीलाच दिलेत
देवाने अश्रूंचे वरदान
तुमच्यासाठी ती
ढाळेल आपले अश्रू
नका करू तिच्या
अश्रूंचा अपमान
शेवटी "स्रीच" आहे
तुमचा प्राण

श्री. प्रकाश साळवी,

बदलापूर - ठाणे
दि.22/08/2014.

Comments