किती सांगून पाहिले

किती सांगून  पाहिले, समजाविले मी मनाला
खरे पाहता जगण्याचा अर्थ निघून गेला

या विराण वाळवंटी आल्या कुठून पालख्या
भक्तीत नाचण्याचा छंद हा विरून गेला

येथेच फुलले फुलांचे ताटवे कितीदा तरी
हा मनाचा भ्रमर इथे सुगंध हुंगून गेला

किती गायिली विराण गीते विराणलेल्या पणाची
मंत्र मुग्ध शब्द त्यांचा अर्थ सांगून गेला

आली जराशी हुशारी या मनाला जगण्याची
नादात संगीताच्या तो गुरफटून गेला

झोकून देती खुळेपणाने  या निर्झराचे फवारे
पाहून जोश या जगण्याचा मंत्र घोकून गेला

श्री. प्रकाश साळवी दि. ०८ मे २०१४.

Comments