वणवा

वणवा

रानात पेटलेला "वणवा" माझ्या मनात पेटला,
का "षडरीपुंचा" संग्राम मनी माझ्या चालला,

कल्लोळ करिती "राग-द्वेष" मनास देती यातना,
कसे आवरावे हेच कळेना, धुडगूस यांनी घातला,

क्षणोक्षणी हा "लोभ" धावे मन माझे त्याच्यासवे,
मन माझे धावते, पण नाही शोध त्याचा थांबला.

हे सुंदर जग सारे "मोहात" गुंतलो मी
चिखलात गुंतला पाय माझा परी माझा मी भला,

क्षणभंगुर सारे जीवन पण मी "मदाने" भारलो,
कोणी नसे मज सारखा असा मज भ्रम जाहला,

घोंगावती मक्षिका या "मत्सर" माझ्या मनी,
रामे तिने धाडिले वनी, मत्सराने त्याचा घात केला,

षडरिपुंना आवरण्या बळ देई हे दयाघना,
कसे आवरू या रिपुंना, का येई ना तुज कळवला ?

ना सोडिले या षडरिपुंनी कोणा कोणासही ,
"नामात" दंग होऊनी घोट षडरुपुंनी घेतला,

श्री प्रकाश साळवी दि. १६ मार्च २०१४ दु. ११.४० 

Comments