येथे शहाणे कोण आहे?

येथे शहाणे कोण आहे?

आता मला समजले येथे शहाणे कोण आहे!
ते शहाणे किती, आणि दीड शहाणे कोण आहे!

हे मायावी जगाचे मायाजाल आहे येथे
ठाऊक हे कोणा येथे दीवाणे कोण आहे !

काव्यात रंगलेले सारे रसिकजन "रसिक" येथे
ते सारे "अरसिक" किती आणि रसिक कोण आहे!

मानले पुन्हा जरी हे सारे शहाणेच आहे
मोजले तरी स्वतःला मी शहाणा कोण आहे!

उगाच हा कशाला हवा वाद येथे शहाण्यांचा
ठरवावे जयाने खुळा की  शहाणा कोण आहे!

श्री. प्रकाश साळवी दि. १५ मे २०१४.

Comments

Popular posts from this blog

गीत ऐक्याचे ।