वेदना

वेदना

का उफाळून येती या वेदनांच्या जाणीवा !
का काट्याला कळेल काय अर्थ याचा नवा !

भळभळती वेदना आणि रक्ताळल्या भावना,
उष्ण-उन चांदणे, अन शीत सुर्य नवा नवा,

आर्त - धुंद वेदना अन धुंद - धुंद आसवे,
ओघळले रक्ताचे अश्रू, अन अनुभव हा हवा हवा,

कुणी घालील काय फुंकर, या वेदनेची जात नवी,
स्पंदन - कंपन - रुदन , अन वेदनेचा जोश नवा,

स्वरचित - > श्री प्रकाश साळवी. दिनांक - ०९-०३-२०१४ वेळ सकाळी ११.३०

Comments