रे तुझ्या वाचून येथले...

रे तुझ्या वाचून येथले...

काय तू समजतोस स्वतःला मीच सर्व काही
रे तुझ्या वाचून येथले काहीच अडणार नाही !

जी तुझ्या सवे राहिली "सावली" बनोनी
रे तुझ्या वाचून ती एकटी पडणार नाही

जमवतोस तू माया इथली पैका अडका
रे तुझ्या वाचून ते सारे काय सडणार नाही ?

जे केलेस कष्ट दिन-रात राब राबोनी
रे तुझ्या वाचून वारस तुझे भांडणार नाही?

जमविलेस  तू येथे सगे सोयरे मित्र जीवाचे
रे तुझ्या वाचून ते तुझा ठाव-ठिकाणा पुसणार नाही?

तू कोण कुणाचा शोध हा तू घेशील का?
रे तुझ्या वाचून  कोणी "तू कोण?"  ते सांगणार नाही.

श्री. प्रकाश साळवी दि. ०३ मे २०१४.

Comments

Popular posts from this blog

गीत ऐक्याचे ।