पुढारी

पुढारी
त्यांना हार तुरे वाहिले,त्यांचेच गीत गाईले
अन उधळिली स्तुती सुमने, गोडवे त्यांचेच गाईले

त्यांचेच सेवक जाहलो, रात्रन दिन वाहिलो,
परी न त्यांचे राहिलो, दिन आमुचे साहिले,

गर्जना त्यांच्याच होत्या, हाती झेंडे मिरविले,
जे लढलेच नाही कधी, त्याचेच पवाडे गाईले ,

ढाल तलवार त्यांचे जाहलो, प्राणांची तमा न केली
राबलो - गांजलो अन "मुर्दाबाद" मात्र आम्ही पहिले,

ते " पुढारी" जाहले, लाल बत्ती त्यांना मिळाली,
आम्ही उपाशी राहिलो, त्यांनी मागे वळून ना पाहिले,

प्रकाश साळवी दि. २२ मार्च २०१४

Comments