बाजार (नात्या-गोत्यांचा)

बाजार (नात्या-गोत्यांचा)

निशःब्द भावनांचा बाजार मांडला हा,
कट्या-कूट यांचा संसार मांडला हा,

आयुष्य जाळूनी जगतो उगाच मी,
नात्यांमध्ये दुरावा, कधी वाढतो हा,

सारे सुखाचे सोबती, न दुः खात साथ देती,
परी वेदनांचा वणवाच पेटतो हा,

निस्वार्थ - त्याग शब्द हे "कोशातले",
लवलेश त्यांचा न कोठे दिसे हा,

चौकडीतली हि नाती, ना भाऊबंदकी हि,
दीड दमडीचा मांडला पसारा हा,

फसवीच नाती,फसवीच गोती,
दिखावाच सारा, नात्या-गोत्याचा हा,

मरणात त्यांच्या किती "आसवे" ढाळती  हे,
सरणावर जळताच "वाट्यास" भांडती हे,

स्वरचित : कवी प्रकाश साळवी 

Comments