आताच "शब्द" माझे

आताच "शब्द" माझे

आताच "शब्द" माझे काहीतरी सांगून गेले
आताच "शब्द" माझे अंतरंगी गूढ उकळून गेले

शब्द एक मोठे धारदार शास्त्र आहे
वापरले जपून ज्यांनी, कोडे त्यांचे उलगडून गेले

शब्दात "अर्थ" सारे ठासून भारलेले
ज्याने जसे वापरले त्यांचे "मंत्र" होऊन गेले

शब्द एक शब्दाचा शब्दच भारी वाटे
वापरले वजन "शब्दाचे" काम त्यांचे होऊन गेले

शब्दास शब्द गेला वाढीव भांडणाचा
शब्दास ज्यांच्या जपले त्यांनी ते "महात्मे" होऊन गेले

श्री.प्रकाश साळवी दि. २८ एप्रिल २०१४.  

Comments