तू येशील का?

तू येशील का?

माझिया मनीचे गुज तू पुसशील का?
तोडूनी सर्व बंध तू येशील का?

टिपूर चांदणे पुनवेचे अन तू असावीस जवळी,
या चांदण्याचे अमृत सेवण्या तू येशील का?

हि किर्र रात तुजवीण वाटे उदासवाणी,
रात राणीचे सुंगंध घेउनि तू येशील का?

का जीवन वाटे उदासवाणे, सर्व काही तुचही,
मोकळ्या  केसात गजरा माळून तू येशील का?

काय जगाची तमा तुला, तू स्वैर मोकळी,
अबोल आपुले प्रेम सार्थ करण्या तू येशील का?

हे नियतीनेच बांधले धागे आपुल्या प्रीतीचे,
धुंद - बेधुंद होऊनी अशी तू येशील का?

ये अशी तू मुक्तपणे सर्व पाश तोडूनी,
शपथ आपुल्या प्रीतीची तू येशील का?

श्री. प्रकाश साळवी दि. १३ एप्रिल २०१४.



Comments