प्रीत माझी भाबडी

प्रीत माझी भाबडी

शृंगार केला तूजसाठी रे सख्या पाहून जा
प्रीतीत गाईले जरी गाणे गडे ऐकून जा

सुगंध शिंपिला फुलांचा लाजली जाई-जुई
शब्दात नाचुनी प्रीत दिवाणी तू घोकून जा

चैत्रात चांदणे जणू सैलावले नभांगणी
आभाळ फाटल्यापरी सर्व संग भोगून जा

ठेऊन लज्जा वेशीवरी मी निसंग जाहले
तुझ्या प्रीतीचे ते किनारे मैफिली शोधून जा

पाण्यापरी निष्कलंक ही प्रीत माझी भाबडी
धुंदीत येउनि फुलांचा ताटवा फेटून जा

श्री. प्रकाश साळवी दि. १७ मे २०१४.

http:/www.prakashsalvi1.blogspot.in

Comments