मसणवटा !!

मसणवटा !!

एक मढे ! पांढऱ्या कापडात गुंडाळलेले ,
तोंडात "तुळशीपत्र" तरीही "मी" म्हणतोय;
आजूनही "मी" पणा सोडवत नाही!
जन्माला आला तेंव्हा हसवले सर्वांना ,
आणि रडवले "माय" ला!
जाताना रडवित गेला सर्वांना ,
हसला मात्र (मनात) पूत; कारण.....
मरेपर्यंत अन्नान्न करीत ठेवले, अन
आता "केसांचे" दान करून,
पुण्य पाडून घेतोय पदरात!
आता मी याचा वारस, म्हणून,
मनात आनंदला अन
जाळा म्हणतो याला लवकर,
तिकडे "नाभिक" वस्तारा पारजतोय,
कर मुंडी समोर, भादरतो तुझे केस,
मानधन माझे तेव्हढे दे, म्हणतोय,
पीठाचे गोळे करून "पींड" पाडणारे गुरुजी,
तोंडाने मंत्रांचे पठन, आणि मनात "दक्षिणेची" आठवण !
सगे-सोयरे मख्ख चेहरा करून
बसलेत आजूबाजूला, म्हणतात सुटलो याच्या, जाचातून,
देण त्याच नाही त्यांना आठवत,
काव-काव करीत कावळ्या सारखे
आरे उरका जर लवकर, म्हणत,
एक दिवस आपल्यालाही येथेच
यायचे आहे! आला एकटा
आणि जाणारही एकटाच
असा हा "मसणवटा"
स्वरचित श्री. प्रकाश साळवी.
दि. १३ मार्च २०१४, सकाळी ११.२० मी.

Comments