प्रेमाचा दिवस [व्यालेनटाइन डे]

प्रेमाचा दिवस [व्यालेनटाइन डे]

[सर्व प्रथम प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची माफी मागतो. कारण त्यांची पण अशीच एक कविता आहे. पण हा माझा केविलवाणा प्रयत्न आहे.]
**
प्रेम कुणीही कुणावर करावे.. पण ..
त्यात नसावा स्वार्थ ..निर्व्याज, निष्पाप .. असावे प्रेम

प्रेम फुलांवर करावे, प्रेम पानावर करावे,
प्रेम फुलपाखरावर करावे, प्रेम मुलांवर करावे,
प्रेम दुसऱ्यावर करावे, प्रेम स्वतःवर करावे,
प्रेम पावसावर करावे, प्रेम गवतावर करावे,
गवतावरच्या दवावर करावे,
प्रेम रानफुलावर करावे, प्रेम काळ्या मातीवर करावे,
प्रेम आईवर करावे, वडिलांवर करावे,
साऱ्या कुटुंबावर करावे, प्रेम भावावर करावे,
बहिणीवरही प्रेम करावे,
"सुंदर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर प्रेम करावे,"
प्रेम देवावर करावे, भक्तीवर करावे,
मन बहरून टाकणाऱ्या सुगंधावर करावे,
स्वतः जळून दुसऱ्यास प्रकाश देणाऱ्या,
ज्योतीवर करावे, प्रेम प्रेमावर करावे,
प्रेम कुणीही कुणावर करावे,
निरागस बालकांवर करावे,प्रेम अनाश्रीतावर करावे,
आश्रीतावर करावे, प्रेम उन्हातान्हात राबणाऱ्या रांगड्या कामकारयावर करावे,
प्रेम मध माश्यांवर करावे,तर कधी भुंग्यावर करावे,
प्रेम शक्तीवर करावे, प्रेम भक्तीवर करावे,
सागराला प्राशन करणाऱ्या "अगस्ती" वर पण करावे,
प्रेम म्हातारयांवर करावे, लंगड्या-पांगळ्या वर करावे,
आजारी माणसांवर करावे प्रेम,

प्रेम अखंड करीत राहावे, प्रेम साऱ्या विश्वावर करावे,
कारण प्रेम प्रेम असते, निस्वार्थ - निरागस
अशी देवाची देन असते.
*******************************************************************>
स्वरचित : श्री. प्रकाश साळवी   

Comments