प्रतीक्षा!

प्रतीक्षा!

दारात उभी राहून दूर दूर ,
कोणासाठी झाली आहेस आतुर,
हे प्रिये! तुझा प्रियकर
कधी येणार आहे!
              चंचल होऊन कधी आंत
              अन कधी बाहेर,
              किती आतुर तू
              कवणाची पाहत वाट,
कमरेवर हात ठेउनी
खालचा ओठ दुमडूनी,
नयन थकले वाट पाहुनी,
कधी - कधी तू येणार आहे,
            डोळ्यात माझ्या तुझीच मूर्ती,
            तूच मन माझे, अन तूच स्फूर्ती,
            दोन चक्षुची आरती,
           पण, तू कधी येणार आहे,
दिसलास जरी कधी एकदा,
नाही अलविदा - नाही अलविदा,
झाले तुजवर मी फिदा,
सर्वस्वाने मी तुझीच आहे,

कवी प्रकाश साळवी दि. १५ मार्च २०१४ दु. २.२०

Comments