कवितेचा दास.!

कवितेचा दास.!

चालताना रस्त्याने कविता प्रसवतो मी,
झोपेतून जागताना कविता सुचवतो मी,

मोठे शब्दांचे पंख लाउनी उडाले आकाश ते,
पंखाच्या एका पिसाने घेतली भरारी मी,

संस्कृतीचे बांधले मोठे इमले त्यांनी
शब्दांच्या साध्या विटांनी बांधली झोपडी मी,

दाम्भिकतेचे गरळ ओकले ते काही बाही,
साध्याच रंगांनी रंगविली कविता मी,

दर्शवते जणू कवितेचे एकले जाणते ते,
विनम्र होऊन तुम्हा सांगतो कवितेचा दास मी.

श्री. प्रकाश साळवी दि. १९ एप्रिल २०१४.

Comments