कधी लागेल गोडी तव नामाची!!

कधी लागेल गोडी तव नामाची!!

जाणिले जरी अशाश्वत विश्व सारे,
अशाश्वत ब्रम्हांड सारे,
तरीही ओढ ना घेई तव नामाची,
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

सारे सुखाचे सांगाती, दुखाःत ना साथ देती,
मायेचा पसारा, मायेत चिंब भिजवती,
तव नामात सुख मोठे आली त्याची प्रचीती,
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

ज्ञानेश-तुक्याने सांगितली याचीच महती,
गोरा-नाम्याने यानेच साधली प्रगती,
संत समागमानेच होईल नाहीशी अधोगती,
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

तव नामातच दंग होऊ दे - गुंग होऊ दे,
तन-मन माझे तुझेच नामी लागू दे,
नामातच रंगुनी जाऊ दे हीच विनंती
का रे दयाघना? कधी लागेल गोडी तव नामाची.

श्री प्रकाश साळवी दि २४ मार्च २०१४

Comments