पुनवेचे चांदणे

पुनवेचे चांदणे

चांदणे अंधारी फितूर झाले
रात्रीचे प्रकाशाशी सुत जमले
उजळून निघाल्या चांदण्या प्रकाशाने विजेच्या
अन काजव्यांचे थवेच्या थवे नाचले
*
पसरले आकाशाचे वादळ पंख
मिटले ते अंधकारी मारून डंख
मोडून निघाला पुनवेचा तो चंद्र तो
आकाश सागरीचा प्रकाश शंख
*
पसरला पुनवेचा तो प्रकाश सागर
ढवळून निघाला तीमिरांचा खंदर
चांदण्यांनी लुटले सारे लख लख
निशब्द चांदणे अन निर्सर्ग सुंदर

श्री. प्रकाश साळवी दि. २६ एप्रिल २०१४.

Comments

Popular posts from this blog

गीत ऐक्याचे ।