ओघळले अश्रू...!

ओघळले अश्रू...!

ओघळलेले अश्रू निखारेच होते
पापण्यांचे ते किनारेच होते ।।1।।

का जाहल्या वाटा ऊदास ह्या
वाटचे वाटसरू हे शिकारेच होते ।।2।।

देऊच केले नजराणे फूलांनी
तूझे हासणे ते बहाणेच होते ।।3।।

भरले आकाश पाखरांनी थव्यांच्या
मदमस्त तूझे ते नजारेच होते ।।4।।

मखमली चालणे गजगामिनीचे
नजरेत तूझ्या त्या दरारेच होते ।।5।।

चांदण्यात होती खीन्नता जराशी
स्पर्षात माजलेले थरारेच होते ।।6।।

श्री. प्रकाश साळवी.
दि. 10-09-2014.

Comments

Popular posts from this blog

गीत ऐक्याचे ।