अनाहूत ....

अनाहूत ....

जाता तू पाऊलांचे ठसे ऊमटून गेली
ह्रदयात माझ्या शिल्प तू कोरून गेली
नयनात तूझीया ढग दाटून आले
पापण्यांची फूले ईथे बरसून गेली
लाजणे फूलापरी फूलपाखरू बनावे
मनाची फूले ह्रदयी ऊमलून गेली
शब्दात काय सांगू अपूरेच सारे
ही रात्र सारी ह्रदय चोरून गेली
पाहिले मागे वळून हासुन जेंव्हा
गूज अंतरीचे परी सांगून गेली
लावण्य तूझे मज भूलवून गेले
क्षणात मती काही कुंठून गेली

श्री. प्रकाश साळवी
दि. 16/09/2014

Comments

Popular posts from this blog

कलिका !