प्रतारणा

प्रतारणा

प्रतारणा करू किती तरी मनाशी?
दिखावेच सारे सांगू कसे जनाशी?
फूलून यावी प्रीती बकुळ फूलापरी
नाते जुळुन यावे कसे मनाचे मनाशी
शब्दात शब्द व्हावे जसा सुगंध फुलांचा
न रूचे खोटेपणा हा चिकटलो या पणाशी
जरासा भूललो मी दांभिकपणाला
जगणे आपले जुळले प्राक्तनाशी
आताच थोडे धुंदीत रान प्यालो
कोरड्याच आशा गुंफित जिवनाशी
सांगू कसे कुणाला ईतीहास या व्यथांचे
शोधित राहीलो सुखाला मन्मनाशी

श्री. प्रकाश साळवी
दि. 06/10/2014

Comments

Popular posts from this blog

अनाहूत ....

कलिका !