आठवणी...

आठवणी...

जे माझ्या मनात आहे ते मी बोलणार नाही
हरवलेली वाट धुक्याची मी शोधणार नाही

जरी पाहीले मी चांदण्यात फिरताना तुला
डोळे मिटून मी चांदणे विसरणार नाही

केले जरी आता तू फीतूर चांदण्यांना जरी
बाग तुझ्या बहाण्यांची मी शिंपणार नाही

सुगंध आता जरी तू शिंपडून आली बरी
वाटते जे तूला मात्र आता घडणार नाही

धुंडाळून पाहीले जरी मज तू रानोरानी
आयुष्य गत जन्माचे पुनःश्च स्मरणार नाही

आले जरी भरोनी वादळी ढग आसवांचे
चिंब भिजून आता तरीही मी रडणार नाही

श्री.प्रकाश साळवी
दि. १३-०१-२०१४

Comments