कलिका !

कलिका !
तू पाहीलेस मागे वळूनी
अन् बहरले झाड फुलांचे
डोळ्यांचे लवते पाते अन्
भरून नभ आले चांदण्यांचे
हलकेच हास्य ऊधळूनी
साठविले नयनात माझ्या
तू कोमल कलिका फुलली
ह्रूदयाच्या आठवणीत माझ्या
वय तुझे फुलण्याचे तू
फुलपाखरासम फुलत रहा
हास्यात तुझ्या रंगुन
जाऊ दे; तू नभाकडे पहा

श्री.प्रकाश साळवी

Comments